Mescaline

Posted: December 10, 2010 in Subconcious

Being an ardent fan of “The Matrix”  it occupied one part of my brain already.Sometimes when mind stop working it automatically goes to  such store ( many such places exists there! don’t ask me how) and relive moments in the movie.

Today morning while coming to office such situation arisen and I visited my “The Matrix” place.Saw the sequence and heard the dialogue

Neo: You ever have that feeling where you’re not sure if you’re awake or still dreaming?

Choi: Mmm, all the time. It’s called mescaline. It’s the only way to fly.

Mescaline is word strike me.Cause most of the time my mind is in this state and am not able to fly yet :-)

jokes apart this is situation where i can imagine when day is not yet ended and night has already started “Twilight”.
But its twilight for person’s mind not atmosphere .
I tried searching meaning of this word but wiki only gave me hallucinogenic !!!
It’s always a way to my ImagineLand..Wonderland whatever people may call but its only my world ,my rules ,my desires…me me me me me only me.
Now i got base for all that creation …its fantasy turned into reality
Does it need base?? it only helps when me and ME clashes sometimes and create chaos in both world this may act as boundary for both…. Not to be crossed…..Period.

If you wanna say….

Posted: December 7, 2010 in Me
Tags: , ,

image

I found what I always wanted to say but never got words ….

WordPress for Android

पल्लवी…

Posted: November 22, 2010 in Me, Mistakes
Tags: , ,



पल्लवी….

कॉलेजमधील एक घोंगावणारे वादळ माझ्या आयुष्यात एक थंड हवेची झुळुक बनुन कसे आले हे मला अजुनही न उलगडलेले कोडे आहे..पण या झुळुकेने आयुष्याला कलटणी जी दिली ती मात्र एखादे चक्रीवादळ सुध्धा देणार नाही.

आमची पहिली भेट HOD च्या ऑफिसमध्ये झाली..झाली कसली ती करवली ती सुध्धा HOD ने. कारण काय तर आम्ही दोघांनी नोटिसबोर्ड वाचुन वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी अर्ज केला होता.त्या दिवशी प्रथम मला ती हिटलरची सुधारीत आवृत्ती भासली परंतु तो सुरवतीचा भासच ठरला.

तीचा भुतकाळ बघता तीच्या बरोबर वादविवाद स्पर्धेमध्ये भाग म्हणजे मला सन्मानच होता कारण या मॅडम त्यांच्या शाळेच्या मंत्रीमंडळात होत्या, विद्यार्थी समितीच्या अध्यक्षा, भरीस रानडे स्मृती वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम म्हणजे सचिन तेंडुलकर बरोबर शालेय टीम मधला अकरावा खेळाडु Direct World cup Final ला ओपनिंग !!

पण पहिल्यापासुन पल्लवीने सर्व जबाबदारी आपल्याकडे घेतली including माझी .मुद्देसुद बोलणे, सर्व गोष्टींची नोंद करणे , संयमीत आक्रमकता ईत्यादी गोष्टीं बघता प्रथमत: ती मीन राशीची आहे यावर माझा विश्वासच बसला नाही.मला तर माझ्या पुढे मुर्तीमंत सिंह रास दिसत होती. कालंतराने कळाले की तिचा भाऊ ज्योतीष विषारद आहे मग आपल्याकडे बढाईचा हा मुद्दा पण गेला.

अश्या सर्व गोष्टींमधुन आमची तयारी चालु झाली.

कॉलेजमध्ये मुलींचा व मुलांचा वर्ग वेगळा असल्याने तयारीचे co-ordination करायची जबाबदारी मी तिच्या वरच सोपावली.(नेहमीची सवय कामास आली ) आणि तिने त्याचा व्यवस्थीत पाठपुरावा करण्यास चोख सुरुवात केली. एरवी शांत असलेली जर कोणी डिवचले तर मात्र रणचंडीका व्हायला वेळ लगायचा नाही. एकदा आमचे लेक्चर चालु असतांना ही मला बोलवायला आली सर जरा खवळलेले होते त्यामुळे आणी लेक्चर मध्ये खंड पडल्यामुळे ते आणखीनच भडकले. म्हणाले ” काय फ़िरायला जायचे आहे काय ?” झाले माता खवळली म्हणाली ” होय जरा गाडीची चावी देता का तुमची ? लवकर येऊ मग “….सगळा क्लास सरांना विसरुन खदाखदा हसला.पण ईतक्या काळात पल्लवी माझ्यावर चिडलेली मला तरी आठवत नाही. पण हिच्या वागण्याने माझी नेहमीच पंचाईत व्हायची.

अशीच एकदा श्रावणात सत्यनारायणाची पुजा होती माझ्या घरी (दर श्रावणात घालतो बरं का आम्ही !….ईति पुणेरी). बरेच पाहुणे मंडळी घरी होती , पुजा झाल्यावर पल्लवीने माझ्या आईला वाकुन नमस्कार केला आणी म्हणाली ” येते हं आई !”…ईकडे माझे आईवडील व सगळे नातेवाईक गार…एकदम Statue ! मग धक्यातुन सावरल्यावर आई लगेच म्हणाली “अगं थांब पहिल्यांदाच आली आहेस अशी कशी जाशील ?” मग आईने आत जाउन एक Dress material आणले आता गार व्हायची पाळी पल्लवी आणी माझी !

सगळे गेल्यावर आई म्हणाली “गोड आहे मुलगी.” तीची समजुत काढता काढता माझे नाकेनाउ आले.काय करणार मणींदरसिंगने मार्शलला bouncer वर Six मारल्यावर काय होणार दोघेही surprise वेगवेगळ्या कारणांमुळे !

आमची तयारी नियामीत चालु होती.आम्ही रोज कॉलेजमध्ये जागा नसल्याने हिरवळ अथवा कॉलेजसमोरील कॅन्टीनमध्ये भेटुन तयारी करत असु.कॉलेज पुरातन आणी coeducation नसल्याने सगळी कडे याची चर्चा चालु झाली व याचा संदर्भ मी दिला त्यावेळी ती म्हणाली तुला काही त्रास नाही ना मग झाले आणी त्रास झाला तर मला सांग मी बघते त्यांच्याकडे….मी कधी डॉनला पाहीले नाही पण तीला ईतर लोक का घाबरतात याचा अंदाज मला चांगलाच आला.

सरतेशेवटी आमचा स्पर्धेसाठी जायचा दिवस आला.नेहमी प्रमाणे आर्थिक ताळेबंद तिच्याकडेच होता आणी मी तिला आधीच कल्पना दिली असल्याने ती निश्चिंत होती (की मी भाजी पोळी खात नाही म्हणुन!).स्पर्धेच्या गावी पोचल्यावर मला माहीती मिळाली कि हिचा मामा ह्याच गावात रहातो त्यामुळे त्यांना भेट देणे compulsary आहे.पण माझ्या सुदैवाने ती एकटीच भेट देउन यायला तयार झाली.प्राथमिक फेरी झाल्यावर पल्लवी मला म्हणाली “मी मामा कडेजाउन येते तु ईथेच थांब आपण एकत्र जेऊ मी आल्यावर ok?”

मी पण म्हणालॊ निश्चिंत होऊन जा आरामात ये मी ईथेच थांबतो तु येइपर्यत.ही वेळ होती सकाळी ११.३० ची.दुपारी १ वाजता बाकी झालेले मित्र जेवायला बोलवायला आले.मी म्हणालो पल्लवी येत आहे तुम्ही जेउन घ्या.मी तिची वाट बघत आहे i promised her i will be here till she come.मी हॉल बाहेरच्या पायरयावर तीची वाट पहात बसलो…१ चे २ झाले २ चे ४ आणी बघता बघता रात्रीचे ८ देखिल वाजले मी तिथेच ! ८.१५ ला रिक्शामधुन पलवि उतरली म्हणाली “काय रे ईथे काय करत आहेस पायरीवर ? मुशयरा चालु झाला असेल गेला नाहीस? “.मी उत्तरलो “तुच सांगितलेस ना की आपण एकत्र जेउ म्हणुन ? या पायरीवर बसायला सांगुन गेलीस तेव्हा पासुन वाट बघत आहे”.हे ऎकुन चकीत झालेली पल्लवी म्हणाली “म्हणजे आजुन तु दुपारपासुन ईथेच बसला आहेस?” बाजुला बसलेले २ मित्र म्हणाले ” किती समजवले चल जेवयला म्हणुन पण साहेब ऎकतात थोडिच सकाळ पासुन बसले आहेत.” पल्लवी घाईघाईने म्हणाली चल आधी होटेलला तिथे बोलु .जवळच्या होटेलमध्ये गेल्यावर ऑर्डरदेउन झाल्यावर तिच्या डोळ्यातुन धारा चालु झाल्या “का?” आता तिला कसे समजवावे हे न कळुन मी उत्तरलो “A promise is a promise but promise to friend is double promise” असे आसल्यावर मी एकटा कसा जेऊ? थोडा वेळ आम्ही दोघेही गप्प होतो काय बोलावे हे न समजुन ती आणी मला भूक लागली असल्याने मी…मग तिच म्हणाली तुला डोसा ईतका आवडतो का? मी म्हणालो याच्या पेक्षा वडापाव खूप जास्त आवडतो पण खूप वडे खाल्लेतर बील खूप येइल…मग ती हसुन म्हणाली मग मी हा डोसा खाउ का ईकडच्या साईड्ने? मी तो पर्यत कधीच डोसा share नव्हता केलेला अगदी आईबरोबर सुध्धा.पण i dont know what happened and i said “ओके चालेल पण थोडाच खा हं! सिरीअसली” .ईकडे आम्ही जेवत असतांना पलीकडच्या टेबलवर चार टारगट पोरे बसली होती त्यांची टवाळकी थोडावेळ दुर्लक्षीत केल्यावर पल्लवी जागेवरुन उठली मी तिला थांबवत म्हणालो “अगं जाउदे ते टवाळकी करणारच” यावर ती थांबलीसुद्धा नाही.त्यांच्या जवळ जाउन म्हणाली ” काय रे काय म्हणालास परत बोल बरे! तंगडे तोडुन हातात नाही दिले तर नाव नाही लावणार पल्लवी”.असा रणचंडीकेचा अवतार पाहुन ती पोरे घाबरली आणी होटेल मालकाने हाकलण्याआत निघुन गेली.

तिचा आवेश पाहुन कोणीही doubt घेतला नसता की तिने त्याचे तंगडे मोडले नसते म्हणुन! ती परत आल्यावर मी मात्र उगाच माझे पाय आवरुन बसलो ! :-)

२ दिवस स्पर्धेच्या ठीकाणी घालवल्यावर (Result वरुन पल्लवीने परीक्षकांशी घातलेला वाद ,निदर्शने ईत्यादी प्रकार सोडुन )आम्ही परत आलो.आता आमचा official कामचा आवका संपला होता परंतु य दरम्यान आम्ही दोघे चांगले मित्र झालो होतो त्यामुळे अधुन मधुन डबा खायला भेटतच राहिलो.तिच्याशी बोललो नसेल तर मला काही तरी चुकल्यासारखे वाटे आणी मी बोललो नाही तर तीला.

कॉलेजसमोरील कॅन्टीन आमचा अड्डा बनला होता.कॉलेज संपल्यावर दुपारी गप्पा टाकल्या शिवाय घरी जाणेच व्हायचे नाही.

मला ती आवडायला लागली होती.पुढचा सगळा विचार करुन निर्णय घ्यायचे ते दिवस नव्हते.फक्त बारावी होऊन BE ला admission

चालू होत्या आणी न्यायालयाने प्रवेश लांबवल्याने आम्ही या कॉलेजमध्ये होतो ही वस्तुस्थिती होती.तरी तिला हे सांगण्याचा मी निश्चय केला.

एका अशाच दुपारी कॅन्टीनमध्ये झोपाळयावर (हो झोपाळा !!) बसुन वडापाव खातांना मी खडा टाकला ” मला आपल्या कॉलेजमधील एक मुलगी खूप आवडते” ऎकुन पल्लवी उडालीच “कधी पासुन? कोण ?” एत्यादी सतरा प्रश्न.मी पण सांगीतले आहे एक खूप आवडते पण तिला सांगायला daring नाय.ती म्हणाली “त्यात काय घाबरायचे? नकाराला घाबरतोस का?” मी म्हणालो “नाही विचारयचीच daring नाय काय करु ? experience नाही” “प्रेमात experience नाही सच्चेपणा लागतो तुला काहीही मदत पाहीजे असेल तर सांग”.मग तिने मला कसे विचारायचे ते सांगीतले म्हणाली एकदा practice kar त्याप्रमाणे मी तिच्या बरोबर एकदा रंगीत तालिम सुद्धा केली.ते झाल्यावर ती म्हणाली एकदम बेस्ट!! आता मुहुर्त काढ आणी विचार.मी म्हणालो आजचा मुहुर्त कसा आहे त्यावर ती म्हणाली शुभस्य: शीघ्रम. मग मी सर्व धीर एकवटुन विचारले “आत्ता ईतक्या वेळा विचारले आजुन हे रिपीट करु का?” न समजुन तिने विचारले “म्हणजे?” “पल्लवी ती दुसरी कोणी नसुन तुच आहेस”.ईतका वेळ हसरी असणारी पल्लवी एकदम गंभीर झाली ” तु गंमत तर नाही करत ना?”. या प्रश्नावर मी पुढची १० मिनटे तिला समजवले कि या सर्व प्रकाराबद्दल sorry पण हे सर्व खरे आहे.”आपण या वर उद्या बोलु ” असे सांगुन तिने तिच्या स्कुटरला किक मारली आणी नेहमीच्या सुसाट वेगाने ती दिसेनाशी झाली. मी आता सर्व संपले असे समजुन देवदासच्या अवस्थेत गेलो.तो दिवस बाकि कसा गेला मला कळालेच नाही.रात्रीभर स्वप्नात देखिल मी तिच्या कडुन भरपुर थोबडीत खाल्या.दुसरया दिवशी कॉलेजला जावे की नाही या विचारात गेलोच नाही दिवसभर तळजाईच्या टेकडीवर घालवल्यावर संध्याकाळी घरी परतलो.आल्या आल्या आईने विचारले काय झाले? कॉलेजला का नाही गेलास ? मी तिला उलट विचारले तळजाईला कोण गेले होते की त्यांनी तुला सांगितले ? मग कळाले की पल्लवीने फोन केला होता की मी कॉलेजला का नाही आलो !!.

next day कॉलेजला पोचल्या पोचल्या पल्लवी भेटली “चल कॅन्टीनमध्ये” मला वाटले कॉलेजला मार खाल्यापेक्षा कॅन्टीनमध्ये मध्ये खाल्लेला बरा ! लोक कमी असतात ! कॅन्टीनमध्ये गेल्यावर विचारले काल कुठे होतास? “तळजाई !” मी उत्तरलो “तु कधी पासुन देवळात जायला लागलास ?” माझे उत्तर “तळजाईला भूत बंगला सुद्धा आहे .”मग तिने बोलायला सुरुवात केली त्यानंतर ती अर्धा तास बोलत होती त्यातले मला काही आठवत नाही मला फक्त तिचे पहिले वाक्य ऎकु आले ” मला पण तु आवड्तोस “.

हवेत तरंगणे म्हणजे काय याचा मी अनुभव पुढील बराच काळ घेतला.

काही दिवसांनी खाली आल्यावर तीने मला समजावले “बघ आजुन आपण खूप लहान आहोत.तु मला आणी मी तुला आवडत जरी असु तरी पुढील निर्णय घ्यायला आपण वेळ द्यायला पाहिजे मला पण करीयर करायचे आहे आणी तुला पण”.माझी admission झाली की मी दुसरया कॉलेजला जाईल तु दुसरया कॉलेजला ! या वर माझ्या कडे एक उपाय आहे जर हे प्रेम खरे असेल तर आपण ४ वर्षे आपले शिक्षण पुर्ण करु आणी हे आकर्षण असेल तर तसेही आपण एकमेकांना विसरु पण जर खरे प्रेम असेल तर याच ठिकाणी याच दिवशी आपण भेटुया या काळात आपण फोन अथवा भेटायचे नाही. नविन कॉलेजला जाई पर्यंत आपण एकमेकांना भेटु पण after that no.Is it ok with you?.माझ्यासमोर यक्षप्रश्न होता पल्लवी जे म्हणत होती त्यात तथ्य देखिल होते.थोड्यावेळाने मी तिचा पर्याय स्विकारला.काही दिवसांनी तिची admission होऊन ती वेगळ्या आणी मी वेगळ्या कॉलेजला गेलो.

काही दिवस त्रास झाला पण नंतर मी कॉलेजला रुळलो.पाखरांसारखी वर्षे उडुन गेली.जुनी calenders sort करतांना मला एक तारीख दिसली खूप विचार केल्यावर आठवले i done promise to meet someone! ती तारीख एक महिन्यानंतर होती पण मी तयार नव्हतो. जाणते अजाणतेपणी मी वचन पाळले होते परंतु पुर्तता करण्यास मन धजावत नव्हते.उपाय सोपा होता जायचेच नाही दुसरयाला उत्तर उमजेल आणी जिवन परत एकदा आपल्या मार्गाने पुढे जाईल.तो पर्यंत हे उमजले होते की संपर्क नसेल तर आकर्षण काय पण खरे प्रेम देखिल कमी होऊ लागते इथे तर ४ वर्षे काळ गेला होता.मनात एका प्रकारे अपराधी भावना होती की आपण हे सर्व कसे विसरलो आणी दुसरीकडे बरे वाटत होते की पल्लवी बरोबर होती .

जसजसा दिवस जवळ येउ लागला तसा मी निर्णय घेतला आपण जायचे पण काहीतरी बतावणी करायची.त्याची तयारी देखील केली.माझ्या एका जवळच्या मैत्रिणीस सर्व प्रकार सांगुन तिच्या मतानुसार हे सांगायचे ठरले की सीमा माझी girlfriend आहे.ठरल्यानुसार मी पल्लवीचा फोन लावला आणी दुसरया दिवशी भेटायचे ठरले.

होटेलमध्ये ठरल्याप्रमाणे भेटल्यावर सहाजीकच सीमा कोण हे प्रश्नचिन्ह तिच्या चेहरयावर स्पष्ट दिसत होते.सुरुवातीचे हाय हॅलो वगैरे झाल्यावर तिचा पहिला प्रश्न होता..”तुला आजुन ते सगळे दिवस आठवतात ?” मी जरा गडबडुन विचारले “हो, का?” ती म्हणाली ” असेच विचरले, तुला सगळ्या अटी पण आठवत असतील, पण तुला कधी माझी आठवण नाही आली? तुला अटी पाळण्यात आनंद होता का मला न भेटल्याचे दु:ख जास्त होते ?” काहीच कल्पना नसल्याने मी पुरता भांबाऊन गेलो होतो.तिथे सीमाने सांभाळुन घेतले.ती म्हणली ” एक मिनीट, तुला काय म्हणावयाचे आहे ?”.पल्लवी म्हणाली “या ईतक्या वर्षात जर खरच तुला ओढ वाटली असती तर या अटी पाळायच्या भानगडीत तु पडला नसतास.”

मी सर्व धीर एकवटुन म्हणालो ” बरोबर आहे तुझे,खरे सांगायचे तर या सगळ्या वर्षानी परीक्षा पाहीली आणी त्यात मी नापास देखील झालो.सीमा माझी girl friend आहे आणी आम्ही एकमेकांत गुंतलो आहोत.ते खरोखरच आकर्षण होते वय म्हणा वा परिस्थीती”.हे ऎकुन ती म्हणाली “मग फोन का केलास भेटलो नसतो तरी चालले असते”.”आपण चांगले मित्र आहोत पल्लवी ,मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या तर गैरसमज दुर करायचे होते”.मला कळत होते की मी खोटे बोलुन गैरसमज तयार करत होतो दुर नव्हतो करत.पण माझा नाईलाज होता कारण मला माहीत होते कि जर प्रेम नसेल तर ते दोघांना त्रासदायक ठरणार होते.पल्लवी हसुन म्हणाली “good nice to hear that,Best luck for you both”.असे म्हणतांना सीमा पासुन तिच्या डोळ्यातील ओलावा लपवण्यात पल्लवी यशस्वी झाली तरी माझ्या पासुन तो नक्कीच लपला नाही.मला माझी चूक कळुन चुकली होती परंतु कळुन देखील न कळल्यासारखे मी करत होतो.कोणाचा विश्वास मी मोडला होता जाणुनबुजुन,जाणते पणी.

आम्ही तेथुन बाहेर पडल्यावर ती मला परत कधीच दिसली नाही की तिचा फोन आला नाही अन मी ही कधी केला नाही.परतल्यावर सीमा म्हणाली “तिचे खरोखरच तुझ्यावर प्रेम होते,तिच्या डोळ्यात दिसत होते.तु असे का केलेस?” मला आठवत होते तिच्या डोळ्यातले बाहेर न आलेले अश्रु आणी तिचे प्रश्न !

I learnt a big difference between attraction and love from her but at what cost ?or was it at her cost?

This post is dedicated to her memories which i spent with her and will always remain part of my life.

 

Long before I went to collage I started talking with myself.

We discussed many things together,Cried,enjoyed, fought  and betrayed with each other but we never parted ways.The only thing that never left me is myself.

We are still one but two and two but one which correctly described in this poem.

My one of favourite poem from    सिलसिला….

मै और मेरी तनहई अक्सर ये बातें करते है
तुम होती तो कैसा होता,
तुम येह कहती ,
तुम वोह कहेती,
तुम इस बात पे हैरान होती,
तुम उस बात पे कितनि हसती,
तुम होती तो ऐसा होता,
तुम होती तो वैसा होता,
मै और मेरी तनहई अक्सर ये बातें करते है

य़े रात् है, या तुम्हारी ज़ुल्फ़े खुली हुइ है ,
है चांदनी या तुम्हारी नजरोंसे मेरी रातें धुली हुई है,
य़े चांद है या तुम्हारा कंगन्
सितारे है या तुम्हारा आंचल्
हवा का झोंका है या तुम्हारे बदन् कि खुशबु
य़े पत्तीयों कि है सर्सराहत् के तुमने चुपके से कुछ कहा है
ये सोचता हुं मै कब् से गुमसुम् के
जब् कि मुझको भी ये खबर् है
के तुम् नही हो, कही नही हो
मगर् ये दिल् है के कह रहा है
के तुम् यहिं हो, यहिं कही हो

मजबुर् ये हालात्, इधर् भी है उधर् भी
तनहाई कि एक् रात्, इधर् भी है उधर् भी
कहने को बहुत् कुछ है, मगर् किससे कहे हम्
कब् तक् युही खामोश् रहे और् सहे हम्
दिल् कहता है दुनिया कि हर् एक् रस्म् उठा दे
दिवार् जो हुम् दोनो में है, आज् गिरा दे
क्युं दिल् में सुलगते रहे,
लोगों को बता दे हां
हमको मोहब्बत् है, मोहब्बत् है, मोहब्बत्
अब दिल् में येहि बात्, इधर् भी है उधर् भी

It’s chol-gar su-estrol

Posted: October 6, 2010 in Uncategorized

It’s not a new language but code word which indirectly bugging my mind for last few weeks .it’s sugar and cholesterol first its like I called it on own.it was wife’s diagnosis but my 9th sense told me hey why don’t you also stepup and get yourself diagnosed? What’s harm in putting some needle in and get your bloody blood scanned.so it started from that when result came everything including my bp shoot up because it was showing too high values it was unusual for me not the doctor .he must be smiling that son carring so much weight on your feet have its own consequences you already carring bp now its sugar and we need to check cholesterol too .It’s sound golden opportunity for me now I can buy car and you will pay installment in for of monthly checks :) its a golden goose walk-in from my door etc etc diwali time for doctor ……enjoy

Its I not ‘me’….

Posted: October 1, 2010 in Me

I was me until late 2000 later when I moved to Bangalore things changed and I avatared into something else which I never wanted to be …but then till I realised it was already 10 years down the drain ….and I thought what am I doing is this I really wanted to do definitely not ….so one fine day I started my journey towards myself ..my real myself till now I not reached but in line of correct road ….these are bits which I encountered in current journey .

One thing is I am damn sure it’s not  ”My Experiements with truth“…no way

….an Odyssey to find myself